इथली माती आणि माणसे बुद्धीमान – आ. संजय जगताप
जेजुरी, दि.१५ ऐतिहासिक असे दक्खनचे पठार पुरंदर तालुक्यापासून सुरू होते. पुरंदरचा परिसर हा निसर्गाच्या विविधतेने नटलेला आहे. आणि इथली माती आणि माणसे बुद्धीमान आहेत. इथल्या वनस्पतींना आयुर्व3दात अत्यंत महत्व आहे. अगदी तसेच आजचे पुरस्कारार्थी पुरंदरच्या वैभवात भर टाकतील असा माझा ठाम विश्वास असल्याचे प्रतिपादन पुरंदर हवेलीचे आ. संजय जगताप यांनी जेजुरी येथे केले
जेजुरी, दि. १५ जेजुरी येथील कडेपठार सोशल क्लब तसेच कै दिनकरराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने आ.संजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सन्मान तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेले पुरंदर तालुक्यातील युवक आणि युवती तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय समाजभूषण व जनसेवा पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते पुरस्कारार्थीना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य सुदाम इंगळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विजय कोलते,तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रदीप पोमण, जेजुरी पालिकेच्या नगरध्यक्षा विना सोनवणे, जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ रामदास कुटे,उपाध्यक्ष पांडूरंग सोनवणे,प्राचार्य नंदकुमार सागर आदी उपस्थित होते.
कडेपठार सोशल क्लबच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्राविण्य मिळविलेले प्रतीक्षा मुलीक,ऋषिकेश राउत,स्नेहल दळवी,आशिष म्हस्के,ऋतुजा वणवे,प्रेरणा कामथे, विनोद पिलाने,ओंकार कोंडे,महेश वाघोले,अभिजित भागत,अनिकेत दुधाळ यांचा गौरव चिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
तसेच कै दिनकरराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने सलग पंचविसाव्या वर्षी राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. इला फौंडेशनचे संस्थापक व पक्षी तज्ञ डॉ सतीश पांडे, श्री गुरुदत्त सेवा ट्रस्टचे अध्यक्ष हभप सदशिव बारसुडे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार तसेच पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर,पत्रकार जोण्टी राउत, आर्कीटेक प्रशांत नाझरेकर, पुणे जिल्हा आरपीआयचे अध्यक्ष पंढरीनाथ जाधव, श्री खंडोबा पालखी सोहळा समितीचे इनामदार राजेंद्र पेशवे, श्री मार्तंड देवसंस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांना जनसेवा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
आमदार संजय जगताप यांनी यावेळी बोलताना सर्व पुरस्कार्थीचे अभिनंदन करून पुरंदर तालुक्यातील सह्याद्री व जयाद्री खोऱ्यातील वन्यपशू व पक्षी,निसर्ग यांचे संवर्धन करण्यासाठी विशेष सहकार्य करणार असल्याचे सांगितेले.
यावेळी प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर आहे या विषयावर व्याखान झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कडेपठार सोशल क्लबचे प्रमुख रवींद्र जोशी ,सूत्रसंचालन श्री मार्तंड देवसंस्थानचे माजी विश्वस्त नितीन राउत तर आभार सदानाना बारसुडे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन सोशल क्लबचे सुधीर गोडसे, रमेश गावडे, महेश काळे,डॉ प्रमोद वाघ,गिरीश राउत, राजेंद्र कुंभार , संजय खोमणे, सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सावंत,संतोष सावंत , डॉ सुमित काकडे, प्रल्हाद गिरमे यांनी केले .
फोटो पाठवला आहे
कडेपठार सोशल क्लब व सावंत प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार देवून सन्मानित केलेले मान्यवर