आ गुलाबराव पाटील यांची जीभ घसरली, म्हणाले
‘सुषमा अंधारे यांना नटी बनवून आमच्या पिक्चर मध्ये आणलं.’
मुंबई : दि.५ शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्याविषयी चुकीचा उल्लेख केला आहे. सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना खुलं आव्हान दिलं होतं. यानंतर या दोघांमध्ये कलगीतुरा सुरु झाला. दरम्यान टीका करताना गुलाबराव पाटील यांची जीभ घसरली.
ठाकरे यांच्या पिक्चरमध्ये नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. सुषमा अंधारे या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी लाडू दिला आहे, म्हणून त्या फिरत आहे. मला माझा जिल्हा ओळखतो. त्यांनाही महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा कुठेही पिक्चर चालला नाही म्हणून त्यांना नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे असते, त्याप्रमाणे त्यांनी आता आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारे यांच्यावर केली.