आशिया कप क्रिकेट 2022, पाकिस्तानचा पराभव आणि पवार साहेबांचा जल्लोष व्हिडियो होतोय व्हायरल

आशिया चषक २०२२ मध्ये अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या भारत-पाकिस्तान सामना भारताने पाच गडी राखून जिंकला. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने तुफानी खेळी खेळत शेवटच्या षटकात सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला.
देशातील अनेक महानगरांमध्ये रस्त्यावर येऊन लोकांचा जल्लोष सुरु झाला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनीही या जल्लोषाचा मोह आवरला नाही.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचा शरद पवार यांनीही घरी बसून आनंद घेतला. हार्दीक पांड्याने शेवटच्या षटकात सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला. यावर शरद पवारांनी हात उंचावत जल्लोष साजरा केला. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शरद पवार हे आपल्या नातवांसोबत टीव्हीवर भारत-पाकिस्तान सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत

पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने १९.५ षटकांत १४७ धावा केल्या. मोहम्मद रिझवानने ४३ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने चार आणि हार्दिक पंड्याने तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने हा खडतर सामना १९.४ षटकांत पाच विकेट्स राखून जिंकला. हार्दिकने षटकार मारून सामना संपवला. यासह भारताने २०२१ च्या पराभवाचा बदला घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page