आय एस एम टी त पुन्हा अपघात, एक जण जखमी
जेजुरी, दि. १८ गेल्या १५ नोव्हेंबर रोजी पहाटे झालेल्या अपघातात आठ जण भाजून जखमी झाल्याची घटना घडली नाही तोच आज पुन्हा या कंपनीत एक जण भाजून जखमी झाल्याची घटना घडली आहे. भट्टीचा पाईप तुटल्याने भाऊसाहेब बरकडे ( वय ४१ ) रा. पिसुर्टी ता. पुरंदर याच्या पायाला भाजले आहे. त्याच्यावर जेजुरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,
सदर कर्मचारी हा काल दुपारी ३ नंतर कंपनीत सेकंड शिप मध्ये कामावर आला असता तो रात्री ११ वाजण्याच्या सुमारास लोखंडी स्क्रॅप वितळवण्याच्या भट्टीचा डेल्टा पार्ट बदलत असताना त्यावरील ३०० ते ५०० डिग्री सेल्सिअस चा गरम चुना व माती त्याच्या डाव्या पायावर पडून भाजला आहे. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खासगी रुग्णालयांकडून याबाबत ची माहिती जेजुरी पोलीस ठाण्यात कळवण्यात आली असून जेजुरी पोलीस याबाबत तपास करीत आहेत.