आय एस एम टी कंपनीत अपघात, आठ जण भाजले

जेजुरी, दि.१५ ( प्रतिनिधी ) जेजुरी नजीक असणाऱ्या आय एस एम टी कंपनीत काल दि. १४ रोजी सकाळी सहा वाजनेच्या दरम्यान लोखंडाचा रस वाहून नेणाऱ्या लॅडलची साखळी ( वायर रोप ) तुटल्याने वितळलेला लोहरस अंगावर पडल्याने आठजण भाजून जखमी झाल्याची घटना घडली आहे.
जेजुरी नजीक मोरगाव रोड वर आय एस एम टी ही कंपनी लोखंडी रॉड, सळई बनवण्याचे काम करते. कंपनीत बॉयलर मध्ये १६५० ते १८०० डिग्री सेल्सिअस ला लोखंड वितळवून लोहरस बनवला जातो. याच लोहरसा पासून वेगवेगळ्या आकाराचे रॉड, वा सळई बनवल्या जातात.

काल सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून यात क्रेन चालक जितेंद्र सिंग, सुजित विलास बरकडे ( वय २५), चुनेज भानुदास बरकडे ( वय २२), अरूनकुमार सिन्हा ( वय ५२ ) आकाश यादव ( वय २२) दुर्गा यादव ( वय ४०) शिवाजी राठोड ( वय ३८) मनोरंजन दास ( वय ३५) हे अंगावर वितळत्या लोखंडाचा रस पडल्याने जखमी झाले आहेत. यातील चारजण गंभीर जखमी असून, क्रेन चालक जितेंद्र सिंग याला पुणे येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे तर इतर सात जनावर जेजुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काल सकाळी सहा वाजता हा अपघात झाला. अपघातात वरून पडलेल्या लोह रसाने आठ जण जखमी झाले असले तरी सुदैवाने मोठा अनुचित प्रकार झाला नाही. मात्र लोखंडापासून बनवलेल्या लोहरसाने कामगार भाजले आहेत.
या संदर्भात कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क केला असता व्यवस्थापनाकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page