आमदार प्रशांत बंब यांचे विरोधात सासवड येथे शिक्षकांची निदर्शने. अशैक्षणिक कामे व ऑनलाइन माहिती कमी करा.
जेजुरी, दि.४ आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत शिक्षकांच्या बाबतीत केलेली दुर्दैवी वक्तव्ये तमाम शिक्षकांचा अपमान करणारी असल्याच्या निषेधार्थ तसेच शासनाने ‘आमचे गुरुजी’ या नावाने शिक्षकांचे फोटो भिंतीवर लावण्याचे अनाकलनीय व अतार्किक आदेश दिले आहेत.या प्रमुख विषयांसह अध्यापन सोडून प्रशासनाने दिलेली अनेक अशैक्षणिक व ऑनलाईन कामे या विरोधात पुरंदर तालुक्यातील सर्वच प्राथमिक व माध्यमिक शिक्षक सामुहिक निदर्शने केली.आमदार बंब यांचा निषेध करत मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.
आमदार प्रशांत बंब यांनी केलेली शिक्षकां विरोधात वक्तव्ये व कारस्थाने ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाविरोधात तसेच लोकशाहीची पायमल्ली करणारी आहेत.त्यामुळे गोरगरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे सार्वत्रिक शिक्षण बंद करुन शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचे षडयंत्र आहे.शिक्षकांची प्रतिमा व प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न यापुढे कोणीही करू नये.”- असे शिक्षक समन्वय कृती समितीचे अध्यक्ष प्रा.नंदकुमार सागर यांनी यावेळी म्हटले आहे.
“प्रशासनाने शिक्षकांना दिलेली अशैक्षणिक कामे तसेच वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्या बाबतचा निर्णय आम्ही दिलेले नाहीत.असे शिक्षण मंत्री सांगतात.मग हे निर्णय नक्की कोण व का घेत आहेत?
याचा शोध घेवून शैक्षणिक वातावरण दूषित करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पुणे जिल्हा केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष
राजेंद्र जगताप यांनी यावेळी केली.
“अनेक शिक्षकांना बी.एल.ओ.सारखी शाळाबाह्य कामे करणे,तसेच वारंवार अनेक प्रकारच्या ऑनलाईन माहिती भरणे ही कामे प्रशासनाने त्वरित कमी करावीत.व विद्यार्थ्यांना फक्त शिकवू द्यावे.” असेही यावेळी शिक्षक समितीचे राज्य संपर्क प्रमुख महादेव माळवदकर पाटील यांनी म्हटले आहे.
यावेळी कुंडलिकराव मेमाणे, शिवाजीराव घोगरे,गणेश लवांडे,मधुबाला कोल्हे,तानाजी फडतरे यांनीही निषेध व्यक्त केला.
यावेळी सुनिल लोणकर,सुधाकर जगदाळे,सुरेश जगताप,सुरेश मोरे,राजेंद्र कुंजीर,संदीप कदम,श्रीधर वाघोले,वर्षा देसाई,मोहिनी लोणकर,अनिता शेलार,
प्रज्ञा वाघमारे,मीना भैरवकर,छाया पोटे,योगिनी शेवते,कल्याणी कटके,प्रकाश जगताप,अनंता जाधव,नंदकुमार चव्हाण,कालिदास पवार,रविंद्र जाधव,जितेंद्र कुंजीर,सतिश कुंजीर,प्रल्हाद कारकर,बाबुराव गायकवाड,संतोष नवले,तानाजी झेंडे,संजीव महापुरे,रघुनाथ ठवाळ,अभिराज चव्हाण,आबासाहेब खवले,विलास दुर्गाडे, नितीन पवार,शरद बोबडे,धनंजय जगताप,सोमनाथ गजरे, शिवाजी राजिवडे,चांगदेव थिकोळे,संजय पापळ यांचेसह सर्वच शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.
सूत्रसंचालन वसंतराव ताकवले यांनी तर आभार दत्तात्रेय रोकडे यांनी मानले.