आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेला मोठा प्रतिसाद विरोधकांना धडकी भरवणारी
पुरंदर, दि.२३ ( बी.एम.काळे) महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार सेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्यानं कोसळलं. राष्ट्रपती निवडणुकीनंतर १२ खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. शिवसेना पक्षावरच शिंदे गटानं दावा सांगितलाय, प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टात प्रकरण लांबणीवर पडत आहे. दुसरीकडे मात्र, उद्धव ठाकरेंना राज्यातील वेगवेगळ्या भागातील शिवसैनिक येऊन भेटत आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करत आहेत. सदस्य नोंदणीचे गठ्ठे जमा करत आहेत. हे चित्र असताना आदित्य ठाकरे राज्यभर फिरत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रांना मिळणाऱ्या तरुणाईच्या प्रतिसादाची शिंदे गटाला धोक्याची घंटा ठरत आहे.
आदित्य ठाकरेंना मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि आता उत्तर महाराष्ट्रातील शिवसंवाद यात्रेला मिळणारा प्रतिसाद, त्यांची नव्या राजकारणाची मांडणी, सोडून गेलेल्या आमदारांना गद्दार म्हणून लावलेल्या विशेषणाला मिळणारी दाद विरोधकांची घालमेल वाढवणारी ठरत आहे. आदित्य ठाकरे राज्यभर फिरुन शिवसेनेची नव्यानं बांधणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला राज्याच्या विविध भागात मिळणारा प्रतिसाद, तरुणाईकडून होणारं स्वागत होताना दिसत आहे.
आदित्य ठाकरेंनी जळगाव जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात जोरदार सभा घेतली. दुसरीकडे पाचोरा तालुक्यातील जम्बोरे गावात आमदार किशोर पाटील यांच्या मतदारसंघातही आदित्य ठाकरेंच्या सभेला तरुणाईचा प्रतिसाद मिळाला. त्या सभेत आदित्य ठाकरेंना सामान्य शिवसैनिक भेटण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसून आलं.
आदित्य ठाकरेंकडून गद्दार म्हणून वारंवार होणारी टीका, दुसरीकडे राज्यभरातील वेगवेगळ्या भागातील शिवसैनिक मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत.