आता तर लालबागचा राजाच नाही तर मतदार ही किरीट सोमय्यांवर हसतात…! मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवत सोमय्यांचे नवीन आरोप
मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी ) काही दिवसांपूर्वी लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “नोएडातील भ्रष्टाचाराचे ट्विन टॉवर पाडले
आता महाराष्ट्रातील अनिल परब यांच्या भ्रष्टाचाराचे स्मारक असलेला त्यांचा रिसॉर्ट पाडण्याची शक्ती बाप्पाने द्यावी अशी प्रार्थना केली. मुंबई महानगरपालिकेतील माफिया सरकार जावे यासाठीही बाप्पाकडे प्रार्थना केली आणि बाप्पाही माझ्याकडे बघून हसले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी नव्या राजकीय आरोपांचे लक्ष?
महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून खाली आल्यानंतरही नेत्यांवर आरोपसत्र सुरूच आहे. ‘मुंबईतील महाकाली गुंफेमध्ये शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांनी घोटाळा केला आहे. ५०० कोटींचा हा घोटाळा आहे. महाकाली गुंफेसाठी ५०० कोटी बिल्डरला दिले, असा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन रवींद्र वायकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. तसंच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही घणाघाती टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंचा उजवा हात संजय राऊत जेलमध्ये डावा हात अनिल परब रिसॉर्ट तुटणार आहे तर तिसरा हात वायकर घोटाळा केला आहेस अशी टीका सोमय्यांनी केली. वास्तविक अनिल परब हे शिवसेनेच्या शिंदे गटाविरोधातील कायदेशीर लढ्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. परिणामी त्यांचा फोकस तिथून कमी करण्यासाठी किरीट सोमैयांना पुन्हा अनिल परब यांना लक्ष करण्याचे आदेश दिले आहेत असं वृत्त आहे तर रवींद्र वायकर यांची त्यांच्या विधानसभा मतदारसंघात मजबूत पकड असून येथे भाजपाला महानगरपालिका निवडणुकीत फटका बसू शकतो म्हणून सोमैयांना पुन्हा नवे आदेश देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतं.
सोमय्यांनी आरोप केलेले हे नेते भाजपमध्ये किंवा भाजप सहकारी झाले आहेत :
१. नारायण राणे
२. यशवंत जाधव – शिंदे गट (ED चौकशी थांबली)
३. यामिनी जाधव – शिंदे गट (ED चौकशी थांबली)
४. भावना गवळी – शिंदे गट (ED चौकशी थांबली आणि मोदींना राखी सुद्धा बांधली)
५. प्रताप सरनाईक – शिंदे गट (ED चौकशी थांबली)