अखिल जुनी जेजुरी मित्र मंडळाच्या शिबिरात १०१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
जेजुरी, दि ७ अखिल जुनीजेजुरी मित्र मंडळाच्या वतीने वतीने सार्वजनिक गणेशोत्सवनिमित्ताने गेली ३५ वर्षे विविध विधायक उपक्रम राबविले आहेत . स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान करून मोठा प्रतिसाद दिला .
या शिबिराचे उदघाटन पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, पुणे जिल्हा दूध संघ संचालक तानाजी जगताप यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी माजी उपनगराध्यक्ष सदाशिव बारसुडे, जिसाचे अध्यक्ष सुरेश उबाळे, माजी नगरसेवक रवींद्र जोशी,सचिन सोनवणे, अजिंक्य देशमुख , संपत कोळेकर, सत्यवान उबाळे, दिगंबर उबाळे, गणेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जगताप, महेश उबाळे, सोमनाथ क्षीरसागर, मछिंद्र पवार, रामभाऊ उबाळे दिणार कोरे जेजुरी देवसंस्थांच्या विश्वस्त संदीप जगताप उपस्थित होते
यावेळी शाळा व अंगणवाडी यांना शैक्षणिक साहित्यांची मदत करून, गरीब गरजू विद्यार्थी दत्तक घेण्यात आले असल्याचे तुषार कुंभारकर यांनी सांगितले .